वेळ जपत ⏳⌛🕛⏰
स्पष्ट आणि अस्पष्ट ,नाही म्हटलं ,तरी नाण्याच्याच बाजु . कानकुस करत , स्वतःसाठी आज वेळ मागतोय घाबरत मनाचा तराजू. सुर्योदयाच्या क्षणापासून , शेवटच्या किरणेत जबाबदारीची जाणीव दिसते सारांश काढता दिवसभराचा , त्यात चेहऱ्यावर हास्याची मात्र उणीव दिसते डोळे झपकताच , दृश्य पलटुन जावे , हिच या लहरी मनाची आशा आहे, बोल ओठांवरचे डोळी दिसे, कारण हि प्रात्यक्षिक नसुन , मनाची भाषा आहे. नाविलाज आहे मानसाचा , बघाना मनाला मारत मारत ,मानसाचाच संप झाला. कधीतरी वेळ चोरून जगेल स्वतःसाठी हा दिलासा देत,अगदी विचारांचा भुकंप आला खंत आहे काहीशी,कि जबाबदारीच्या ओझ्याने ,कलाकारांच्या कलेचा ओलावा , काळानुसार आटतोय. मानसाचा मानसात जिव गुंतवणूही , ,वेळेअभावी तो मानसांपासुन फाटतोय. स्पर्धेच्या बाजारात ,धावनारा आघाडीवर, ज्यात जपलेल्या छंदालादेखील मंदी आली शर्यतीत क्षणभर, पिंजरा करतो सुखाच्या पाखरास, म्हणत त्याला कायमची जेल बंदी झाली. तक्रार ऐकत,दैव जाणनारा स्वतः नशीबाचा काटा डबडबत्याडोळ्यांनी,विचारात पडला कि घड्याळाचा काटा सरकता सरकता, बिचाऱ्या मानसाला घड्याळाचाच आजार ज...