शेतकरी आणि सरकार.
सरकार,, ऐका आज माझही जरा तुम्हाला चुकीचं समजणारा माणूस मी नाही हो. हक्क मी फक्त पोटासाठी मागतो आहे , कारण राजनीती उमजनारा मी मुळीच नाही हो. मी शेतकरी , माझं मत मांडतांना आज वाटतेय मनात भिती आहे काही हो. स्पष्ट करतो पूर्वीच बरंका,,, की मी हरलेला आणि हावरट माणूस खरंच नाही हो. शिकून सवरून मी भोळाच राहिलो असं आडानी बायको मला नेहमी बोलत असते. पैशापाई माझ्या लेकराचं स्वप्न मरू नये मनातच म्हणून ती बिचारी शेतात कंबर मोडून रक्ताला पाण्यावानी तोलत असते. सरकार वर भरुसा हाय अवं माहां अस माझी अडाणी बायको कायम म्हणती बघा. राजनीतिचा पाढा पाठ नाय तिला , तरी पण दिलासा सगळ्यांना देऊन तुमची वकील बनती बघा. संवाद संपत चाललाय आपला म्हणून कदाचित आपली ओळख मिटल्या सारखी वाटू लागली. गरीबी मिटवता मिटवता गरिबांनाच मिटवन्याच्या प्रयत्नांत खरंच शेतकऱ्याच्या जीवनात काळोख दाटू लागली. म्हणुन आजचा हा लेखी संवाद थोडा आणखी लांबवतो बरका,. म्हणुन ह्या भोळ्या जीवाला एक संधी द्याल का. कर्जापाई जर गळफास लावलाच...