Posts

Showing posts from March, 2022

जगण्याची कला

शोध मनाचा मनाशी. एका ठिकाणी थांबतोय उत्तर मिळेल असे वाटताना माझा प्रश्नच जास्त लांबतोय जीवनात प्रवेश करून असंख्य वर्ष झाली. पण त्यात उत्सहाची ती जागा आजही वाटते खाली. पूर्वी सुरूवात आहे असं जाणत मनाने काळाला ठेवलं धरून. उलटता उलटता काळाच्या घागरेत जगण्याचं कारणच जातंय मरून. डोळे डबडबले आहे एकटेपणाने  पण संवाद कुणाशी साधावा. मृत्यू तर मृत्यूच्या पूर्वीच येत आहे मात्र आरोप कुणावर लाधावा लोकांचे हसते चेहरे बगून  चेहरा माझा लावतो आसवांचा मुखवटा.  कदाचित फुटक्या नशिबापोटीच देवाने  दिलाय‌ माझ्या जीवनात कायमचा दुखवटा. सुखाची भिक आगदी न  कळत्या वयातच मागून झाली  आता अश्रूंची सप्रेम भेट मला  सगळ्यांकडूनच न मागता आली.  जीव कोंडला आहे फार  आता समजुतदारपणा देखील बोचतो आहे. जगण्याची कला शिकता आलीच नाही  म्हणून वेळ मरणाची दिशा मोजतो आहे. दुःख लपवावे तर .. आजार तणावाचा लागतोय दुःख सांगावे तर संवाद फक्त एक सांत्वनेचा हात मागतोय. इथे प्रत्येक जण , निष्पाप जिवांच्या सहनशीलतेचा बघत आहे अंत. जगण्याची कला निती आणि योग्यतेपलीकडे  जाऊन नीलाम झाली, ह्याचीच...