Posts

Showing posts from November, 2021

अबोल

अबोल......                            खरंतर बाहेरून अबोल दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला,  व्यक्तीला आतून प्रचंड बोलायचं असत. काही आपल सांगून काही समोरच्याच एकूण  जीवनाच पुस्तकं हळुवार खोलायच असत. पण त्यांचे भाव शब्दात मोजणाऱ्या विश्वात  फक्त अबोल म्हणुन त्यांची ओळख  राहून असते. आणि ह्याच मुळे शब्द त्यांचेही  हरवून जातात, आणि त्यांच्या जीवनात केवळ काळोख राहून असते . सभेत निघावा बोल एकतरी,म्हणत आयुष्याच्या काही भागात आपल्याकडून नकळत पोकळी होऊन जाते.  पण  अबोलपणा एक बोलकेपनाच जणु , हे जाणले तर शब्दांची वाट मोकळी होवून जाते. केवळ शब्दांनीच भावना जानने म्हणजे  वर वर शिल्पाच्या रंग रूपाने मोत्याचा आभास. विचार करा ,काय पुस्तकाचे पृष्ठ बघून  शक्य आहे संपूर्ण पुस्तकाचा आभ्यास. निसर्गही अबोल दिसत असला तरी त्याचे बोल  मापण्याची क्षमता माणसाच्या बोलीत नाही. संथ वाहणाऱ्या ह्या मंजूळ अबोल वाऱ्याचे बोल  चोहीकडे अनुभवतील फक्त एखाद्या खोलीत नाही.  एका चित्रकाराने काढलेले सुंदर चि...