अबोल
अबोल......
खरंतर बाहेरून अबोल दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला,
व्यक्तीला आतून प्रचंड बोलायचं असत.
काही आपल सांगून काही समोरच्याच एकूण
जीवनाच पुस्तकं हळुवार खोलायच असत.
पण त्यांचे भाव शब्दात मोजणाऱ्या विश्वात
फक्त अबोल म्हणुन त्यांची ओळख राहून असते.
आणि ह्याच मुळे शब्द त्यांचेही हरवून जातात,
आणि त्यांच्या जीवनात केवळ काळोख राहून असते .
सभेत निघावा बोल एकतरी,म्हणत आयुष्याच्या
काही भागात आपल्याकडून नकळत पोकळी होऊन जाते.
पण अबोलपणा एक बोलकेपनाच जणु ,
हे जाणले तर शब्दांची वाट मोकळी होवून जाते.
केवळ शब्दांनीच भावना जानने म्हणजे
वर वर शिल्पाच्या रंग रूपाने मोत्याचा आभास.
विचार करा ,काय पुस्तकाचे पृष्ठ बघून
शक्य आहे संपूर्ण पुस्तकाचा आभ्यास.
निसर्गही अबोल दिसत असला तरी त्याचे बोल
मापण्याची क्षमता माणसाच्या बोलीत नाही.
संथ वाहणाऱ्या ह्या मंजूळ अबोल वाऱ्याचे बोल
चोहीकडे अनुभवतील फक्त एखाद्या खोलीत नाही.
एका चित्रकाराने काढलेले सुंदर चित्र
शब्द नसुनही खूप बोलके जाणले जाते.
कुणास ठाऊक का, चित्राच्या सौंदर्यात रमून ते एक टक
बघण्यापेक्षा, मांडलेल्या शब्दांनाच त्याची प्रशंसा समजले जाते.
.
खरं तर मनाची जखम न भरणारी असते,
आणि शब्दांचा उपचार त्याला मुळीच पुरेसा नसतो.
जगण्याच्या परिभाषेसाठी मन भरून जगताना,
मनात भरून जगण्याचा पर्याय मुळीच बरेसा नसतो.
शब्दांमध्ये खूप सामर्थ्य असते पण त्यासाठी
त्याला भाव आणि स्वभावाची साथ हवी.
दुःखात सांत्वनेच्या हाकेला शब्द पुरत नाहीत
तर त्यासाठी मायेने दिलेली सांत्वनेची थाप हवी.
म्हणून शब्दाच्या गर्दीत हरवून ,
मनातील भावनांना एकटं सोडू नका.
अबोलपनाने मनात रंगवलेले सुंदर चित्र
शब्दांच्या माप- तोलाने कधीही खोडू नका.
शब्द , भावना आणि अबोलता जेव्हा एकत्र येतात
तेव्हा मानवतेची परिभाषा मनात रचली जाते.
आणि तिथे वेगळ्या जीवनाचा आभास होवून
ह्रदयाची अबोलता ह्रदयापर्यंत पोहचली जाते........
- देवयानी आहेर ☺️
NICE DEVU
ReplyDeleteAmazing words....
ReplyDeleteKeep it up 👍
Really awesome.. 🙌👏