शेतकरी आणि सरकार.


   सरकार,, ऐका आज माझही जरा 

   तुम्हाला चुकीचं समजणारा माणूस  मी नाही हो.

   हक्क  मी फक्त पोटासाठी मागतो आहे ,

 कारण राजनीती उमजनारा मी मुळीच नाही हो.

   

मी शेतकरी , माझं मत मांडतांना 

आज वाटतेय मनात भिती आहे काही हो.

स्पष्ट करतो पूर्वीच बरंका,,, की मी 

हरलेला आणि हावरट माणूस खरंच नाही हो.



 शिकून सवरून मी भोळाच राहिलो

असं आडानी बायको मला नेहमी बोलत असते.

पैशापाई  माझ्या लेकराचं स्वप्न मरू नये मनातच म्हणून

ती बिचारी शेतात कंबर मोडून रक्ताला पाण्यावानी तोलत असते.


सरकार वर भरुसा हाय अवं माहां

अस माझी अडाणी बायको कायम म्हणती बघा.

राजनीतिचा पाढा पाठ नाय तिला , तरी पण

दिलासा सगळ्यांना देऊन तुमची वकील  बनती बघा.



संवाद संपत चाललाय आपला म्हणून कदाचित

आपली ओळख मिटल्या सारखी वाटू लागली.

गरीबी मिटवता मिटवता गरिबांनाच मिटवन्याच्या

प्रयत्नांत खरंच शेतकऱ्याच्या जीवनात काळोख दाटू लागली.



म्हणुन आजचा हा लेखी संवाद थोडा आणखी लांबवतो बरका,.

 म्हणुन ह्या भोळ्या जीवाला एक संधी द्याल का.

कर्जापाई जर गळफास लावलाच  मी तर

मेल्या नंतर तरी माझ्या पोरांची काळजी तुम्ही घ्याल का.


जन्म माझा शेतकऱ्याच्याच पोटचा

 आणि मी देखील शिक्षण  खूप मनलावून केलं होतं.

बाप माझाही कर्जबाजारीच होता , म्हणुन तेंव्हा Fees नव्हती 

तर माझं नोकरीच स्वप्न अगदी कोंडून कोंडून मेलं होत.


सरकार ,,तेंव्हा तुमच्या निर्णयाची वाट बघत मी माझ्या

शिक्षणाला अगदी उघड्या डोळ्यांनी लावली आग.

पण त्याच आगेत माझ्या लेकरांची स्वप्न जाळू नका

आणि नका तोडू त्या कोवळ्या मनाच्या भरारीची बाग.


बायकोच्या बापाला शब्द दिला होता  मी की

तिच्या डोळ्यात पाणी येऊन नाही देणार.

काय माहित कोणत्या जन्मात ती बिचारी

नोकरीवाल्यांच्या बायकांप्रमाणे  दृश्य मनालीचे पाहणार.

आणि काय सांगू तिला की ह्या वर्षीही संक्रांतीला तिचा 

शेतकरी नवरा  एक साधी साडी पण नाही घेऊन देऊ शकणार.


बरं पुढचं ऐका‌ आता कि,,

मागच्या वर्षी दुष्काळाचा मुकुट घालून

वरून राजा रुसून निघून गेला होता दूर.

आणि ह्या वर्षी ही ओल्या दुष्काळाच्या उत्साहात त्याने 

सगळ पीक एकापरच करूनच टाकल की चकणा- चुर..


 अहो सरकार.

..तेव्हा पाण्यात सडलेलं पिक छातीला लावून

 माझं सारं घर हंबरडा फोडून फोडून रडलं होत.

आणि तेंव्हा ही मीडिया ने याला फक्त

  बातमीसाठी केवळ एक मसाला म्हणूनच धरलं होतं.



खरंतर दुष्काळ जाहीर करतो म्हणत  पंचनाम्याच्या

 नावावर सरकार तूम्ही पण खूप नाचवलं हो.

बाबा भ्रष्ट झाली  बुद्धी  सरकारचीही म्हणत

पोरीच्या वाक्यानं मन आणखी खचवलं हो.


मागची काही वर्षे तर मी नुसता

सातबारा घेऊन फिरत होतो.

सरकार कर्ज माफ करणार म्हणत

अख्खं गाव डोक्यावर घेउन मिरत होतो.


लेकरावाणी मोठ करताना रक्ताचं पाणी करून 

पिकवलेल ते पीक पाण्यात मेलेलं पाहून विचार करा माझं

 डोकं किती झणझणत असल.

विचार करा,,, माझ्या तरुण पोरीच्या अंगावर फाटकी कापडं 

पाहून माझं हारलेल बापपण खरच  काय म्हणत असल.


नुकसान भरपाई नावाच्या खुळखुळ्यानं

पण अगदी बनवून टाकलय मला बकरा.

घरावर साधं नीट छप्पर सुध्दा नाही

म्हणून मी सतत मारत असतो घरकुल योजनेच्या शोधात चकरा.


मागच्या वर्षी कापूस मक्का ठीक होते

तर योग्य भावानं वर्षभर तोंड दाखवलं नाही.

ह्या वर्षी किव आली बिचाऱ्याला पण इकडं

पावसानं काही पिकाचं समाधान चाखवलं नाही.


नफा तोटा तर सोडाच हो पण तोंडाशी

 आलेला घास ही निसर्ग घेतो हिसकावून.

पोटासाठी काढलेलं कर्जाच व्याज वाढत चाललं अस म्हणत 

बँकेचा कर्मचारी पण जातो की बिचकाऊन.



सरसकट कर्जमाफी तर नाही मिळाली पण किमान

खांद्यावरचं  हे न पेलवणारं ओझ थोड तरी करा कमी.

सातवे आठवे वेतन शेतकरी नाही मागणार हो

 पण लेकरांची शिक्षण आणि पोट भरता येईल इतक्यातरी 

नुकसान भरपाईची  द्या हो आता हमी.


 स्वाभिमानी शेतकरी मी काळ्या पैशाच्या आहारी कधी गेलो 

नाही पण लेकरांच तोंड पाहून मी अनुदानाची असतो बघत वाट.

जय जवान जय किसानचे नारे लावणारे आमचेच 

प्रतिनिधी निवडणुकीनंतर चक्क दाखवतात  हो आम्हाला पाठ.


सरकार विश्वसाचं तर राहूच द्या पण तुमच्या योजनांच्या

 खोट्या प्रसारानं मागे जगण्यासाठी आणली होती थोडी हिमंत.

गळफास लावून मी मेलो आज -उद्या जरी तरी लाखो 

शेतकऱ्यांची लेकरं सरकार बनून सरकारलाच दाखवतील  

 आता शेतकऱ्यांची किमंत.



तेव्हा मंजुरी साठी हजारो पुढारी उद्या आमच्या

 लेकरांच्या दारी नंतर  शेकडो मारतील चकरा.

जसं आज पर्यंत त्यांनी आम्हाला बनवलं ना,

 उद्या आमची लेकरं देखील त्यांना बनवतील की बकरा.


हा माझा संताप नाही सरकार ,बाप गमवलेल्या कित्येक त्या 

शेतकऱ्यांच्या लेकरांचा तळतळाट बोलतोय.

देशाची चिंता आणि अहिंसेचे पुजारी आम्हीही आहोत 

म्हणून त्या लेकरांच्या वतीनं मी आज शेतकऱ्यांच जिवन 

खोलतोय.



म्हणुन या नंतर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाची

कृपया कधीच करू नका हो उपेक्षा.

प्रत्येक जाती धर्मातील शेतकरी कुटुंब ह्या देशात

 जगलं पाहिजे सुखानं हीच ह्या गरीब शेतकऱ्याची अंतिम अपेक्षा.



               देवयानी आहेर 🙂🙏





























 











Comments

  1. अप्रतिम..!!अतिशय मार्मिक पद्धतीने केलेलं शेतकऱ्याचं खरं खरं वर्णन खरच खूप वाखाणण्याजोगा आहे खूप खूप खूप सुंदर keep it up dear... 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"दुविधा से समाधान तक "

“Whispers of Rebirth”